आमची कार्यपद्धती

आमची कार्यपद्धती साधी व सोपी आहे. तुमच्या आणि आमच्या व्यवसायाची हीच तर खरी एक सुरुवात आहे...

१) प्रथम तुमच्या जागेची पाहणी करून आम्ही तुम्हाला या व्यवसायाचे पूर्णतः प्रशिक्षण देऊ.

२) आमचे अधिकारी तुमच्या मनातील सर्व शंकांचे निरसन करून आपल्या सोबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतील जेणेकरून व्यवसायाला एक कायदेशीर आधार असेल.

३) कायदेशीर प्रक्रियेनंतर आपल्या शेतात मधमाशी पालनासाठी लागणाऱ्या लाकडी पेट्या व्यवस्थित पद्धतीने लावल्या जातील.

४) मध हा संपूर्णतः मधमाश्यांवर आणि त्यांच्या मध गोळा करणाच्या क्षमतेवर अवलंबून असतो.

५) एका पेटीतून वर्षाला साधारणपणे जास्तीत जास्त १५ ते २० किलो मध तयार होतो. म्हणूनच शुद्ध मधाचे प्रमाण हे अत्यल्प आहे.

६) आपल्याकडून ३०० ते ५०० रुपये प्रतिकिलोने आम्ही मध विकत घेऊ. मधाचा भाव हा त्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल आणि मधमाशी पासून तयार झालेले मेण आम्ही ७०० रुपये प्रतिकिलोने खरेदी करणार आहोत.

७) काही ठराविक दिवसांनी तयार झालेला मध गोळा करण्यासाठी आमच्या कडून अनुभवी अधिकारी आपल्या इथे येऊन गोळा करतील. आम्ही आपला मध विकत घेणार ह्याची १००% हमी आहे.

८) मधाचे व्यवस्थापन आपल्या मार्फत नेहमी योग्य पद्धतीने होत आहे कि नाही यासाठी आमचे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करूच.

अधिक माहितीसाठी संपर्क करा