मधमाशी पालन व्यवसाय : काळाची गरज

मधमाशी पालन हा एक शेतीपूरक पारंपरिक व्यवसाय असून काळानुरुप तो बदलला गेला आहे. पारंपरिक पद्धतीने जंगलात जाऊन मधमाश्यांच्या पोळ्यातून मध गोळा करणे, मधाची साठवण करणे आणि मग विक्री करणे अशा पद्धतीने हा व्यवसाय अनेक वर्षे होत आलेला आहे.

मधमाशी व मध याचा उपयोग जितका शेतीसाठी होतो तितकाच रोजच्या दैनंदिन आयुष्यात देखील मधाचा वापर केला जातो त्यामुळे उत्तम प्रतीच्या मधमाशांचे पालन करून उत्कृष्ठ प्रतीचा मध निर्माण करणे हे गरजेचे झाले आहे.

म्हणूनच मधुमक्षिका पालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे.

बिटो: मधुमक्षिका पालन व्यवसायातील नवीन संधी

'मध' हे मधमाशांच्या लाळेचे फुलांच्या परागकणांशी नैसर्गिक प्रक्रिया होऊन तयार होते. मध हे पोळ्यात जरी तयार होत असले तरी ते तिथून काढणे खूप अवघड असते त्यामुळे मधमाश्याना लाकडी खोक्यात एकत्र करून त्यांना मध निर्माण करण्यासाठी प्रवृत्त केले जाते.

मधुमक्षिका पालन मधून मिळणारे मध हे नैसर्गिक असते व त्याची बाजारात मागणी देखील बरीच असते. मधासोबत पोळ्यात निर्माण होणारे मेण देखील बाजारात विकून आणखी नफा मिळवता येतो. त्यामुळे शेतीसोबत हा एक उत्तम व्यवसाय म्हणून प्रत्येकाला करता येतो.

चला बीटो सोबत जोडूयात आणि एका नवीन व्यवसायाला सुरुवात करूयात !

बिटो सोबत एकत्र या... 

मधुमक्षिका पालन व्यवसायामधून मधमाशांपासून तयार झालेला मध बाजारात विकणे, मधाला उत्तम भाव मिळणे, मधाची प्रत उत्तम राखणे यांसारख्या अनेक आव्हानांचा सामना उद्योजकांना करावा लागतो त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच एक नवीन विचार या व्यवसायात घेऊन येत आहोत.

शेतकऱ्यांना निसर्गाशी सतत झगडावे लागते. सातत्याने प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागते. पैश्याच्या अडचणींना सतत सामोरे जावे लागते. जर शेतकऱ्याने आपल्या शेतात लहान मोठा जोडधंदा केला तर तो या अडचणींवर मात करू शकतो. आणि स्वाभिमानी, स्वावलंबी आणि कर्जमुक्त आयुष्य जगू शकतो. अलीकडच्या काळात विकसित झालेला चांगला जोडधंदा म्हणजे मधमाशी पालन. मधमाशी पालन व्यवस्थित केले तर तो शेतकऱ्यांना कष्टप्रत जीवनामध्ये संजीवनी मंत्रासारखा ठरतो.

अधिक माहिती

शेतकऱ्यांना/ नवीन उद्योजकांना कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नाही.

व्यवसायासाठी सुरुवातीच्या लाकडी मधपेट्या आम्ही मोफत पुरवणार.

हा एक सेंद्रीय पद्धतीने तयार केलेला मध असेल ज्याला प्रदेशात मोठी मागणी आहे.

तयार झालेले मध करारानुसार आम्ही स्वतः विकत घेऊ, जेणेकरून मिळेल व्यवसायाची हमी व परताव्याची शास्वती.

25% ते ५०% सरकारी सबसिडी.

व्यवसायासाठी 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्ज कमी दराने उपलब्ध.

छुपे खर्च नाही, अधिक मेंटेनन्स नाही.

प्रति महिना कमीत कमी 20 हजार ते 1 लाखांपर्यंत कमवण्याची सुवर्णसंधी.