बिटो बद्दल आणखी काही

बिटो: मधुमक्षिका पालन व्यवसायातील नवीन संधी

बिटो गेली अनेक वर्षे आपल्या व्यवसायाच्या निमित्याने शेतकरी व आंतराष्ट्रीय बाजारपेठ याच्यावर अभ्यास करीत आहेत. परदेशामधील बाजारपेठेत भारतीय मधाला वाढलेली मागणी व तसेच नैसर्गिक मधाला मिळणारी रक्कम याचा विचार करता भारतातील मधुमक्षिका पालन हा व्यवसाय एका वेगळ्या पद्धतीने करण्याची किती गरज आहे याची जाणीव त्यांना झाली. 

भारतीय बाजारातील विखुरलेला शेतकरी, मधुमक्षिका पालन व्यवसायात वितरण आणि सेवा याचा अभाव, मार्केटिंग नाही म्हणून कमी किंमत, मधात होणारी साखरेची किंवा गुळाची भेसळ सारख्या अनेक समस्यांचा अभ्यास करून बिटो या संस्थेची सुरुवात झाली. 

महाराष्ट्रातील लहानात लहान खेडेगावातील शेतकऱ्या पर्यंत पोहचून, त्यांना एकत्र आणून, मधुमक्षिका पालन व्यवसायाचे ट्रेनिंग देऊन भारतीय नैसर्गिक मधाला आंतराष्ट्रीय बाजारपेठेत प्रसिद्ध करणे हे त्यांचे स्वप्नं आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क करा

आजच्या बाजारात ज्या वस्तूचे उत्पादन अति अल्प असते त्याचाच भाव अधिक असतो.

1) जैव विविधते मध्ये मधमाश्यांचं महत्व इतकं आहे की, मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानवसृष्टी च नष्ट होईल..? धक्का बसला ना पण हे खरं आहे आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे. हे मत आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारच्या वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात.

2) मधाच्या मोठ्या प्रमाणात प्राप्ती व विक्री साठी मधमाश्या पाळल्या जातात. हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. मधमाशी फुलातील रसांना आणि परागांना मधात बदलते. व त्यास आपल्या पोळ्यात जमा करते. जंगलातून व इतर ठिकाणातून मध गोळा करण्याची फारच प्राचीन परंपरा आहे. बाजारात मधाच्या मागणीस वाढता प्रतिसाद पाहता मधमाशी पालन हा एक फायदेशीर व आर्थिक प्राप्ती करून देणारा व्यवसाय आहे. त्यापासून मिळणारे नैसर्गिक मेण हि आर्थिक लाभ देणारी ठरते.

3) एक मधमाशी साधारण २०० फुलांवर भ्रमण करते. आणि फक्त सुईच्या टोकावर मावेल एवढाच मध गोळा करते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या शुद्ध मधाचे प्रमाण खुपच कमी आहे.

4) मेलीफेरा आणि सतेळी प्रामुख्याने या दोन जातीच्या मध्माश्यांपासून मध तयार होतो.

5) या व्यवसायाकरिता कोणतीही मोठी गुंतवणूक, जागा तसेच दररोज विशेष देखभाल करावी लागत नाही.

६) फुलांचा रस आणि पराग यांचा सदुपयोग होतो आर्थिक प्राप्ती होते आणि रोजगाराचा प्रश्न देखील सुटतो.

७) कोणत्याही इतर जातीच्या खता शिवाय आणि बियांशिवाय मधमाशी पालन हे शेताच्या बांधावर शेतालगत केल्याने त्याचा फायदा शेतीला होतो. शेतातील भाज्या, फळे आणि फुलांच्या उत्पादनात सव्वा ते दीडपट वाढ होते. कारण मधमाश्या परागीकरनाचे काम हे उत्तमरित्या करतात.

८) मधाच्या सेवनाने मानवाचे आरोग्य उत्तम राहते. मध हे एका प्राकृतिक औषधाचे काम करते. मधाच्या सेवनाने अनेक प्रकारच्या ११८ रोगांवर फायदा होतो.

९) मधमाश्या मध गोळा करतात. मध हे अत्यंत पौष्टिक व शक्तीदाय्क अन्न व औषध आहे. मधमाश्या मेण देतात ते सौदर्यप्रसाधने व औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. मधमाश्या पासून मिळणारे राजअन्न (Royalgelly) दंश, विष, व्हीनम, पराग (पोलन, प्रोपौलीस) इत्यादी पदार्थांसाठी उच्च प्रतीचे औषध मूल्य मिळते. परागीभवनाद्वारे शेतीपिके, फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरीव वाढ होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यासाठी त्यांचा फायदा होतो.

१०) या उद्योगात शेतकरी विदेशी मधमाश्या सुद्धा विकत घेऊ शकतात. ज्यांचे मध बनविण्याचे प्रमाण जास्त असते. यामध्ये एपिस, मेलीफेरा, एपिस फ्लोरीया, एपिस दोरसाला, एपिस इंडिका अश्या प्रजाती येतात. एपिस मेलीफेरा सर्वात जास्त मध देणारी आणि अंडे देणारी मधमाशी मानली जाते. म्हणून हि प्रजाती खरेदी करणे फायदेशीर ठरते.

अधिक माहितीसाठी संपर्क करा